Share Market : जिओच्या दमदार लिस्टिंगनंतर टॉप-10 कंपन्यांची यादी बदलली; रिलायन्स पहिल्या क्रमांकावर, जिओ दुसऱ्या स्थानी
Share Market : जिओ प्लॅटफॉर्म्सचा शेअर ₹1,417.35 वर बंद झाल्यानंतर कंपनीचे बाजारमूल्य ₹13 लाख कोटींच्या पुढे गेले. बाजारमूल्यानुसार देशातील टॉप-10 कंपन्यांची नवी यादी जाणून घ्या.

Share Market : जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअरची बुधवारी शेअर बाजारात दमदार नोंद झाली. ₹1,119 या इश्यू किमतीपेक्षा 21 टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर शेअरची लिस्टिंग झाली. त्यानंतर शेअरमध्ये आणखी तेजी आली. दिवसअखेर जिओ प्लॅटफॉर्म्सचा शेअर ₹1,417.35 वर बंद झाला. म्हणजेच इश्यू किमतीपेक्षा 26.66 टक्के वाढ झाली.
शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सचे बाजारमूल्य ₹13 लाख कोटींच्या पुढे गेले. त्यामुळे बाजारमूल्यानुसार देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत जिओ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. पहिल्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज कायम आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य सुमारे ₹15.68 लाख कोटी, तर जिओ प्लॅटफॉर्म्सचे ₹13.05 लाख कोटी झाले. जिओने भारती एअरटेलला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. एअरटेलचे बाजारमूल्य सुमारे ₹11.88 लाख कोटी आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्स ही भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. तिच्या जिओ इन्फोकॉम या उपकंपनीचे सुमारे 53 कोटी ग्राहक आहेत. 2016 मध्ये सुरू झालेल्या जिओने अवघ्या 10 वर्षांत मोठी बाजारपेठ तयार केली आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान खुला होता. गुंतवणूकदारांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. 26 ऑक्टोबरला शेअरचे वाटप झाले आणि 28 ऑक्टोबरला बीएसई व एनएसईवर लिस्टिंग झाली.
बाजारमूल्यानुसार देशातील टॉप-10 कंपन्या –
रिलायन्स इंडस्ट्रीज – ₹15,67,744.61 कोटी
जिओ प्लॅटफॉर्म्स – ₹13,05,241.98 कोटी
भारती एअरटेल – ₹11,88,244.20 कोटी
एचडीएफसी बँक – ₹10,58,188.40 कोटी
आयसीआयसीआय बँक – ₹9,86,735.85 कोटी
टीसीएस – ₹8,89,325.91 कोटी
एसबीआय – ₹8,83,139.34 कोटी
बजाज फायनान्स – ₹5,71,075.66 कोटी
लार्सन अँड टुब्रो – ₹5,35,341.12 कोटी
एलआयसी – ₹4,94,614.82 कोटी
जिओच्या शेअरमध्ये पहिल्याच दिवशी झालेल्या मोठ्या वाढीमुळे देशातील बाजारमूल्यानुसार कंपन्यांच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे.





