3 जुलै पासून जिओने आपल्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. यामुळे बरेच युजर नाराज झाले आहेत. त्यामुळे आता कंपनीने या नाराज युजर्ससाठी ओटीटी बंडलसह दोन नवीन प्लान बाजारात आणले आहेत. या प्लॅनमुळे नाराज युजर्सना थोडासा दिलासा मिळेल अशी आशा कंपनीकडून व्यक्त केली जात आहे. Jio च्या या प्लॅन्समध्ये काय काय सुविधा आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…. जिओचा 949 रुपयांचा प्रीपेड प्लॅन जिओने 84 दिवसांच्या वैधतेसह 949 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB डेटाची सुविधा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ घेता येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस मिळतील. याशिवाय डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल ॲपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाणार आहे. जे 3 महिन्यांसाठी वैध असेल. 949 रुपयांच्या या प्लानमध्ये यूजर्सना 5G वेलकम ऑफर देखील मिळत आहे. जिओचा 1049 रुपयांचा प्रीपेड प्लॅन जिओने 84 दिवसांच्या वैधतेसह 1049 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे. याशिवाय, SonyLIV आणि ZEE5 चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तसेच यूजर्सना 5G वेलकम ऑफर देखील मिळत आहे. जिओने ‘हे’ प्लॅन केले बंद जिओने अलीकडेच त्यांचे दोन स्वस्त आणि लोकप्रिय प्लॅन बंद केले आहेत. या प्लॅनची किंमत 149 रुपये आणि 179 रुपये होती. या दोन्ही प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 1GB डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळत होती. 149 रुपयांचा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध होता, तर 179 रुपयांचा प्लॅन 18 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध होता.