Jio Recharge : जिओची नववर्ष भेट! ₹399 मध्ये 28 दिवस अनलिमिटेड डेटा; ₹3,999 मध्ये वर्षभर
Jio Recharge : जिओच्या हॅपी न्यू इयर 2.0 ऑफरमध्ये 399 आणि 3999 रुपयांचे अनलिमिटेड डेटा प्लॅन. 15, 25 आणि 50 रुपयांच्या डेटा पॅकचे फायदे आणि वैधता जाणून घ्या.

Jio Recharge : नववर्षाच्या स्वागतासाठी रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी ‘हॅपी न्यू इयर 2.0’ ही विशेष रिचार्ज ऑफर आणली आहे. यामध्ये 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवस आणि 3,999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये 365 दिवस अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा वापरण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय मोफत व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसही मिळतील. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये आधी असलेली दररोज 2.5 जीबी डेटाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. (Jio Recharge)
कंपनीने 15 आणि 25 रुपयांचे अनलिमिटेड 5G डेटा ॲड-ऑन पॅकही आणले आहेत. तर रात्री इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी 50 रुपयांचा स्वतंत्र डेटा पॅक उपलब्ध केला आहे. या नव्या ऑफरमुळे कमी कालावधीसाठी किंवा वर्षभरासाठी जास्त इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांना पर्याय मिळणार आहे.
399 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळणार? (Jio Recharge)
जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये पुढील सुविधा मिळतील.
– अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा
– देशभरात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग
– दररोज 100 एसएमएस
– 12 महिन्यांचे कॅनव्हा प्रो सबस्क्रिप्शन
– जिओहॉटस्टार मोबाईल आणि हॉलीवूड कंटेंट
– जिओटीव्हीद्वारे फॅनकोड सबस्क्रिप्शन
– जिओगेम्स मोबाईल सबस्क्रिप्शन
– जिओएआयक्लाउडवर 50 जीबी मोफत स्टोरेज
याशिवाय जस्टडायल लाइट, हायपरलोकल कूपन्स आणि डिजिटल डायरीसारख्या सुविधाही मिळणार आहेत. कॅनव्हा प्रो सबस्क्रिप्शनची कंपनीने नमूद केलेली किंमत सुमारे 4 हजार रुपये आहे.
3,999 रुपयांचा वार्षिक प्लॅन – (Jio Recharge)
वारंवार रिचार्ज करण्याची गरज टाळू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने 3,999 रुपयांचा वार्षिक प्लॅन आणला आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजेच एक वर्ष असेल.
यामध्ये अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. यासोबत 12 महिन्यांचे कॅनव्हा प्रो लाइट सबस्क्रिप्शन, जिओहॉटस्टार, जिओटीव्हीद्वारे फॅनकोड आणि 50 जीबी क्लाउड स्टोरेज मिळणार आहे.
15 आणि 25 रुपयांत अनलिमिटेड 5G डेटा – (Jio Recharge)
जास्त इंटरनेटची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने दोन छोटे डेटा पॅक आणले आहेत.
– 15 रुपयांचा पॅक : एक दिवस अनलिमिटेड 5G डेटा.
– 25 रुपयांचा पॅक : दोन दिवस अनलिमिटेड 5G डेटा.
या पॅकमध्ये डाउनलोडची मर्यादा किंवा इंटरनेटचा वेग कमी करण्याची अट नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र हे पॅक 5G डेटासाठी आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी 5G नेटवर्क आणि पात्रता आवश्यक आहे.
50 रुपयांत रात्री अनलिमिटेड डेटा –
रात्री उशिरापर्यंत इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी 50 रुपयांचा नाइट डेटा पॅक आणण्यात आला आहे. या पॅकची वैधता 28 दिवस असेल. दररोज मध्यरात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा वापरता येईल. या वेळेत वापरलेला डेटा मुख्य प्लॅनच्या दिवसभराच्या डेटा मर्यादेतून वजा होणार नाही.
रिचार्ज कधी आणि कुठे करता येणार?
399 आणि 3,999 रुपयांचे प्लॅन 24 नोव्हेंबरपासून उपलब्ध झाले आहेत. 25 रुपयांचा डेटा पॅकही 24 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. 15 रुपयांचा पॅक आधीपासून उपलब्ध आहे. तर 50 रुपयांचा नाइट डेटा पॅक 26 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे.
ग्राहक मायजिओ ॲप, जिओची अधिकृत वेबसाइट, जिओ स्टोअर्स आणि अधिकृत रिटेलर्सकडून रिचार्ज करू शकतात.





