Best Recharge Plans | काही दिवसांपूर्वीच JioHotstar हा ओटीटी प्लॅटफॉर्म नव्याने लाँच झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, आयपीएल पाहण्याचा आनंद तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर JioHotstar चे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. JioHotstar सबस्क्रिप्शनसह येणाऱ्या या रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. Jio चे रिचार्ज प्लॅन्स जिओकडे 949 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांसासाठी दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS सह JioHotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत मिळते. याशिवाय, जिओकडे 195 रुपयांचा डेटा पॅक देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन आणि 15 जीबी डेटा दिला जातो. Airtel चे रिचार्ज प्लॅन्स Airtel च्या 398 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 2GB डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS यासारखे फायदे मिळतात. कंपनीकडे 84 दिवसांच्या वैधतेसह येणारा 1029 रुपयांचा प्लॅन देखील आहे. यामध्ये दररोज 2 जीबी डेटा, दररोज 100 मोफत आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तुम्ही जर 1 वर्षांच्या मुदतीसह येणारा प्लॅन शोधत असाल, तर 3999 रुपयांच्या प्लॅनचा विचार करू शकता. यामध्ये 1 वर्षासाठी दररोज 2.5 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. या तिन्ही रिचार्ज प्लॅन्समध्ये तुम्हाला जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. Vi चे रिचार्ज प्लॅन्स Vi च्या 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये 4 जीबी अतिरिक्त डेटासह 3 महिन्यांसाठी JioHotstar सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय, 469 रुपयांच्या रिचार्जमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 2.5 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. कंपनीकडे 994 रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटासह दररोज 100 मोफत एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि JioHotstar चे सबस्क्रिप्शन मिळते.