झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई ! चकमकीत ६ नक्षलवादी ठार, SLR आणि INSAS रायफल्स जप्त

Jharkhand Encounter | झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील लालपानिया भागातील लुगू टेकड्यांमध्ये राज्य पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान, आज पहाटे, लालपानियाच्या लुगु टेकड्यांमध्ये सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत सहभागी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून एक एसएलआर आणि एक इन्सास रायफल जप्त केली.
सैनिकांना कोणतीही दुखापत नाही Jharkhand Encounter |
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांनी सांगितले की, “नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सैनिकांना कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. शोध मोहिमेसोबत अधूनमधून गोळीबार सुरू आहे.”
Jharkhand | The Central Reserve Police Force, in a joint operation with state police, neutralised four naxals in an exchange of fire this morning in Lugu hills under Lalpania area of Jharkhand’s Bokaro district. The troops have recovered one SLR and one INSAS rifle. No injury to…
— ANI (@ANI) April 21, 2025
१२ एप्रिल रोजी एका सैनिकाचा मृत्यू Jharkhand Encounter |
१२ एप्रिल रोजी झारखंडमधील चाईबासा येथे झालेल्या आयईडी स्फोटात झारखंड जग्वार फोर्सचा एक जवान शहीद झाला. चाईबासा स्फोटात एक सीआरपीएफ जवान जखमी झाला. यापूर्वी, झारखंडमधील झाराईकेला येथे नक्षलविरोधी कारवाईदरम्यान दोन सीआरपीएफ जवान जखमी झाले होते.
ही घटना झाराईकेला पोलीस स्टेशन परिसरात घडली. जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरने रांची येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हेही वाचा
झारखंडमध्ये ‘राजपूत करणी सेने’च्या प्रदेशाध्यक्षाची हत्या ; गाडीतून उतरताच डोक्यात झाडली गोळी





