झारखंडचे शिक्षणमंत्री रामदास सोरेन यांची प्रकृती गंभीर; बाथरूममध्ये पडल्याने दुखापत

Ramdas Soren | झारखंडचे शिक्षणमंत्री रामदास सोरेन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शनिवारी बाथरूममध्ये घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सध्या रामदास सोरेन यांना जमशेदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. इरफान अन्सारी ही माहिती दिली.
अन्सारी यांनी सांगितले की, मंत्री रामदास सोरेन यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि डॉक्टरांची टीम त्यांना चांगल्या उपचारांसाठी दिल्लीला विमानाने नेण्याची तयारी करत आहे. याशिवाय स्वतः अन्सारी प्रत्येक क्षणाची माहिती घेत आहेत. त्यांनी रामदास सोरेन यांच्या लवकर बरे होण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे. दरम्यान, रामदास सोरेन बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत आणि रक्ताची गाठ झाली आहे.
झारखंड के शिक्षा मंत्री, हमारे बड़े भाई श्री रामदास सोरेन जी के अस्वस्थ होने की खबर बेहद चिंताजनक है। बाथरूम में गिरने से उन्हें ब्रेन में चोट व ब्लड क्लॉट हुआ है। उन्हें एयरलिफ्ट कर दिल्ली के मेदांता हॉस्पिटल ले जाया जा रहा है।
मैं लगातार उनकी स्थिति की निगरानी कर रहा हूँ।
आप… pic.twitter.com/EjrpVE3A2Q— Dr. Irfan Ansari (@IrfanAnsariMLA) August 2, 2025
रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी
सुरुवातीला त्यांना जमशेदपूरच्या टाटा मोटर्स रुग्णालयात नेण्यात आले. तिथून हवाई रुग्णवाहिकेने त्यांना दिल्लीला नेण्यात आले. त्यांच्या बिघडत्या प्रकृतीची बातमी मिळताच, राज्य सरकारचे अनेक मंत्री त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कोणालाही मंत्र्यांना भेटण्याची परवानगी नाही. याशिवाय रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी जमली आहे.
रामदास सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे वरिष्ठ नेते आणि कोल्हाण प्रदेशाचे आमदार आहेत. चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हेमंत सोरेन यांनी त्यांना मंत्रीपद दिले होते. 2024 च्या निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा मंत्री बनवण्यात आले.
हेही वाचा :





