Jhalak Dikhla Ja 11: मनीषा राणीने कोरले ‘झलक दिखला जा 11’च्या ट्रॉफीवर नाव; मिळाली ‘इतकी’ रक्कम

Jhalak Dikhla Ja 11 : डान्स रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा सीझन 11’ चा नुकताच मोठ्या अंतिम सोहळा उत्साहात पार पडला. यंदाच्या या शोची मनीषा राणी विजेती ठरली आहे. मनीषा ही पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक आहे, जिने झलक दिखला जा या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’ मुळे मनीषा अधिक चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिने ‘झलक दिखला जा सीझन 11’ च्या ट्रॉफीवर नाव कोरलं.
यंदाच्या या शोमध्ये धनश्री वर्मा, शोएब इब्राहिम, मनीषा राणी, अद्रिजा सिन्हा आणि श्रीराम चंद्रा हे पाच फायनलिस्ट होते. त्यानंतर मनीषा राणी, अद्रिजा सिन्हा आणि शोएब इब्राहिम टॉप 3 मध्ये होते. मात्र, अखेरची लढत टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिम आणि मनीषा यांच्यात झाली. याशिवाय बॉलिवूड कलाकार सारा अली खान, विजय वर्मा, हुमा कुरेशी त्यांच्या आगामी मर्डर मुबारक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिनालेवेळी उपस्थित राहिले होते.
View this post on Instagram
‘झलक दिखला जा 11’या कार्यक्रमाची ट्रॉफी जिंकल्यानंतर मनीषा राणीने इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. मनीषाने पोस्टमध्ये ट्रॉफीसोबतचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, “स्वप्ने खरी होतात. आज तुम्हा सर्वांचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द कमी आहेत. बिहारच्या एका छोट्या गावातल्या एका मुलीनं मोठी स्वप्ने पाहिली आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भारत एकत्र आला. झलकच्या प्रवासात ज्यांनी मला इतकं प्रेम दिलं आणि ट्रॉफीही दिली त्या सर्वांचे आभार, खूप आनंदी होत आहे.”
ट्रॉफीसह मिळाले 30 लाख रुपयांचे बक्षीस
‘झलक दिखला जा 11’ ची विजेती मनीषा राणीला ट्रॉफीसह 30 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मनीषाचा कोरिओग्राफर आशुतोष पवार याला देखील 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. याशिवाय मनीषा आणि आशुतोष यांना दुबईजवळील एका बेटावरच्या ट्रीपचे पॅकेज देखील देण्यात आले आहे.





