जेनिफर लोपेझ – बेन ऍफ्लेक पुन्हा आले ‘एकत्र’

हॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांच्या नात्याबाबत अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होती. असेही म्हटले जात होते की लवकरच हे जोडपे घटस्फोट घेणार आहे. मात्र आता या चर्चांना पूर्ण विराम लागला आहे. आता सोशल मीडिया या जोडप्याच्या चाहत्यांनी ते घटस्फोट घेणार नसल्याचा दावा केला आहे.
हे दोघेही नुकतेच मुलांसोबत दिसले. सर्वांनी एकत्र ब्रंच केले. यादरम्यान जेनिफर आणि बेन हात पकडताना दिसले. असेही बोलले जात आहे की यावेळी जेनिफर आणि बेनची केमेस्ट्री दिसून आली. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांनी काही आठवड्यांपूर्वी आपलं नातं संपवण्यासाठी घटस्फोटाची याचिका दाखल केली होती.
Jennifer Lopez & Ben Affleck With Their Kids Out For Lunch !
Full Video: https://t.co/9wJNebxjkW pic.twitter.com/seBMtQCBqF
— JLo Updates (@lopez_updates) September 15, 2024
जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पापाराझींना त्याचे फोटो क्लिक करण्यापासून थांबवतानाही दिसत आहे. ब्रंचदरम्यान जेनिफरने तिच्या लग्नाची अंगठीही घातली होती, असेही बोलले जात आहे. या जोडप्याने अद्याप त्यांच्या नात्याच्या सद्य स्थितीबद्दल भाष्य केलेले नाही. हे दोघे त्यांच्या मुलांसह सेराफिना, सॅम्युअल, एमे आणि मॅक्ससह एकत्र आले होते. असे म्हटले जात आहे की, बेनची माजी पत्नी जेनिफर गार्नर ब्रंचनंतर मुलांना घेण्यासाठी आली होती.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की जेनिफरने घटस्फोटासाठी अर्ज केला कारण बेनने लग्न वाचवण्यात रस दाखवला नाही. जेनिफर हे नाते वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती.





