मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये जेडीयूच्या ‘या’ नेत्यांची मंत्रीपदी लागणार वर्णी ; वाचा कोणाचा लागला नंबर ?

JDU Leaders in Modi Cabinet। पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी शपथ घेण्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांपर्यंत फोन पोहोचण्यास सुरुवात झालीय. ललन सिंह यांना कॅबिनेट मंत्रीपद तर रामनाथ ठाकूर यांना जेडीयू कोट्यातून राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ललन सिंह बिहारच्या मुंगेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार झाले आहेत. राम नाथ ठाकूर हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि ते भारतरत्न पुरस्कार विजेते कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र आहेत.
संध्याकाळी 7.15 वाजता कार्यक्रमाचे नियोजन JDU Leaders in Modi Cabinet।
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी आज ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ही कामगिरी करणारे ते दुसरे राजकारणी ठरणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, त्याची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू आहे. राष्ट्रीय राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था JDU Leaders in Modi Cabinet।
दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहे. ड्रोन उडवण्यास आणि पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. 9 आणि 10 जून रोजी दिल्लीत कलम 144 लागू होणार आहे. राष्ट्रपती भवनाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात होईल.





