जयेशभाई जोरदारचा ट्रेलर रिलीज

मुंबई – अभिनेता रणवीर सिंग आपल्या अभिनयामुळे चर्चेत असतो. चाहत्यांना त्याच्या चित्रपटांमध्ये त्याला नेहमीच वेगळ्या भूमिकेत पाहायला आवडते आणि प्रत्येकवेळी त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते त्याच्या अभिनयाला दाद देत असतात.
View this post on Instagram
रणवीरकडे सध्या अनेक रोमांचक चित्रपट आहे. पण सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे जयेशभाई जोरदार. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
नुकताच जयेशभाई जोरदार चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रणवीर सिंगने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रणवीर सिंग असून अभिनेत्री शालिनी पांडे, अभिनेत्री रत्ना पाठक शाह आणि अभिनेता बोमन इराणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रणवीर सिंह “सूर्यवंशी’मध्येही झळकणार आहे. याशिवाय त्याचा स्पोर्टस ड्रामा “83′ हा चित्रपटाही झळकणार आहे.





