“नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?” ; जयश्री थोरातांचा वसंत देशमुखांवर पलटवार

Jayashree Thorat on Vasant Deshmukh । अहमदनगरमधील संगमनेर जिल्ह्यात झालेल्या एका सभेने संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपच्या एका जाहीर सभेत वसंत देशमुख यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संगमनेरमध्ये चांगलाच राडा झाल्याचे दिसून येत आहे. संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या दिला होता. दरम्यान, वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह्य वक्तव्यावर जयश्री थोरात
यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
“जे बोलले ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? ” Jayashree Thorat on Vasant Deshmukh ।
वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्यवर बोलताना जयश्री थोरात यांनी, “जे काही काल घडलं ते कुणालाही न शोभणारं, अत्यंत वाईट आहे… जर महिलांनी राजकारणात यायचं असेल, तर असं बोलल्यास कोण येणार? मी असं काय केलं होतं की, माझ्याबद्दल एवढं वाईट बोलले? जे बोलले ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? विरोधाला पण एक पातळी असते, नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?”, असा सवाल जयश्री थोरात यांनी व्यक्त केला आहे.
“मला सुजय विखेंना एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही बसवलेले अध्यक्ष तिथे बोलतायत सुजय विखेंनीही चाकूर गावामधे माझ्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. मला माहीत नाही की, सुजय विखे त्यांना भडकावतायत की काय? पण हे सगळं आम्ही गेल्या काही दिवसांपासून अनुभवतो आहोत… आक्षेपार्ह विरोध केलेल्या देशमुख यांना अटक का केली नाही? महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जे घडतंय ते चुकीचं आहे, असंही जयश्री थोरात म्हणाल्या आहेत.
संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण Jayashree Thorat on Vasant Deshmukh ।
जयश्री थोरातांबाबत सुजय विखेंच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण आहे. आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. जयश्री थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबेंसह कार्यकर्त्यांनी 8 तास पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या दिला. दरम्यान, या प्रकरणात चार गुन्हे दाखल करण्यात आले यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप करण्यात आलाय.





