“खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर” ; बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा

Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil। विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी अनेक नेत्यांनी सभा आणि मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. यांच्या माध्यमातून सर्व नेते मंडळी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत आहेत. काही दिवसापूर्वी भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी देखील असा एक मेळावा घेत महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील सडेतोड उत्तर दिले होते . मात्र आता या सर्वात बाळासाहेब थोरात यांच्या मुलीने या वादात उडी घेतली आहे. तसेच त्यांनी सुजय विखे पाटील यांना तुमची जागा दाखवून देऊ असे म्हणत इशारा दिला आहे.
“खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर” Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil।
भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी एका मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी बोलताना बाळासाहेब थोरात यांना,तुमची दहशत मोडल्याशिवाय राहणार नाही” असे म्हटले होते. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी पालटवावं करत ‘राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता आमदार होणंही अवघड झालं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री सोडा, आता ते आमदार तरी राहतात का?’, अशी खोचक टीका केली होती.
या दोघांच्या शाब्दिक वादात आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखेंना इशारा देत हल्लाबोल केला आहे. “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर”, असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात जयश्री थोरात बोलत होत्या.
ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही ते … Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil।
“संगमनेर तालुक्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचा स्वाभीमान आहेत. खबरदार! माझ्या बापाविषयी तुम्ही काही बोलले तर. ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही, ते आपलं घर काय सांभाळणार”, असा इशारा जयश्री थोरात यांनी माजी खासदार सुजय विखे यांना दिला आहे. “तुमचं महायुतीचं सरकार जेव्हापासून आलं, तेव्हापासून त्रास चालू झाला. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी त्यांचं काही वाईट केलं नव्हतं. बाळासाहेब थोरात हे सर्वात जास्त काळ महसूलमंत्री राहिले आहेत. पण त्यांनी कधी कोणाचं वाटोळं केलं नाही. कोणालाही त्रास दिला नाही”, असं म्हणत जयश्री थोरात यांनी नाव न घेता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली.





