Jayashree Patil : सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का ! जयश्री पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश

सांगली : काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. जयश्री पाटील यांच्या प्रवेशामुळे सांगलीत काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून सांगलीतील काँग्रेससमोरील आव्हानात वाढ झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील मोठा गट भाजपात सहभागी झाला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशामुळे आता सांगलीत काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.
या पक्षप्रवेशात काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते वसंत दादा पाटील यांच्या घराण्यातील मोठा गट भाजपात सहभागी झाला आहे. जयश्री पाटील या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. तसेच त्या माजी दिवंगत मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. जयश्री पाटील या सांगलीतल बड्या प्रस्थ आहेत. त्यामुळे भाजपला त्यांच्या राजकीय ताकदीचा मोठा फायदा सांगली जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे.
फडणवीसांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया
जयश्री पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर “भारतीय जनता पक्षाचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं. सांगली महापालिका असेल, सांगली जिल्हा परिषद असेल, तिथे दोन वेळा खासदार असतील, आमदार असतील, अशा विविध जागी भाजपला खूप चांगलं यश सांगली जिल्ह्यात मिळालं. त्यामुळे आमची साहजिक अपेक्षा होती की, आपला पक्ष सांगलीत आणखी मजबूत करण्यासाठी अजून चांगली मंडळी जी वेगवेगळ्या पक्षांत आहेत, पण त्यांना तिथे न्याय मिळत नाही. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन अतिशय मजबुतीने काम वाढवलं पाहिजे, असा विचार आला” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.





