Jayant Patil: “समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे…”; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले
Jayant Patil : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे देखील करण्यात आले होते.

Jayant Patil: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुखनेते अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले. मागील काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे देखील करण्यात आले होते. यानंतर आता विलीनीकरणाच्या चर्चांवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील ?
“विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबलेली आहे. ज्यांच्यासोबत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, ते नेते आता हयात नाहीत. दोन्ही पक्षांचं विलीनीकरण व्हावं, याची सुरुवात अजित पवार यांच्याकडून सुरु झाली होती. मात्र आता ते या जगात नाहीत. दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत हे समजून घेणारा नेताच नसल्यामुळे विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे आणि यापुढे विलीनीकरणाची शक्यता नाही. त्यामुळे आता दोन पक्षांचं विलीनीकरण होणार नाही,” असं जयंत पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.
दरम्यान, अजित पवार व शरद पवार गटातील नेत्यांच्या अनेक बैठका झाला, 12 फेब्रुवारी रोजी अजितदादा हे राष्ट्रवादी विलीनीकरणाची घोषणा करणार होते. दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी दादांची इच्छा होती, अशी विधान शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सातत्याने केल्या जात होत्या. मात्र अजित पवार गटातील नेते किंवा सुनेत्रा पवार यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केलं नव्हतं.
याशिवाय एवढ्या मोठ्या नेत्याचे निधन झाल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील शंका दूर करण्याचे काम सरकारने करावे अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे. रोहित पवारांनी पायलटबाबत जो आक्षेप घेतला आहे. त्यांचा कॉल रेकॉर्ड, कुणाशी संभाषण झाले, गेले २-३ महिने पायलटला कोण भेटले याचा तपशील काढावा, असेही यावेळी जयंत पाटील यांनी म्हंटले आहे. Jayant Patil: ”
हेही वाचा:






