BJP Maharashtra Rajya Sabha Election Candidate : भाजपकडून राज्यसभेसाठी ४ उमेदवारांची नावं जाहीर; रामदास आठवलेंना दिली पुन्हा संधी
BJP Maharashtra Rajya Sabha Election Candidate : 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत.

BJP Maharashtra Rajya Sabha Election Candidate : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने चार उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली आहे.
कालच भाजपने इतर राज्यातील उमेदवार जाहीर केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आज महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने चार उमेदरवारांची नाव जाहीर केली आहेत.
दरम्यान, 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 7 जागा आहेत, तर तामिळनाडू 6 आणि पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी 5 जागा आहेत.
राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (BJP Maharashtra Rajya Sabha Election Candidate)
- 5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
- 6 मार्च – अर्जांची छाननी
- 9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
- 16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान, तर त्याच दिवशी सायं. 5 नंतर मतमोजणी होईल.
हेही वाचा:






