“लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा” ; जयंत पाटील यांची मागणी

Jayant Patil on Ladki Bhaeen Yojana । राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेम्बरचा हफ्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात नुकतेच जमा झाले आहेत. त्यानंतर आता मात्र महायुती सरकारकडून या योजनेस अपात्र असणाऱ्या बहिणीची पडताळणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर धुळे जिल्ह्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यातील रक्कम देखील परत घेण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
इथून पुढील नवीन लाडक्या बहिणींसाठी निकष लावा Jayant Patil on Ladki Bhaeen Yojana ।
राज्यात 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व घरी चारचाकी गाडी असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यांची स्रुटीनी (पडताळणी) होणार असल्याचे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरेंनी सांगितले. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेत ज्या सवलती यापूर्वी दिल्यात त्या कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नयेत. जे निकष लावायचे आहेत ते इथून पुढील नवीन लाडक्या बहिणींसाठी लावा अशी मागणी विरोधीपक्षनेते जयंत पाटील यांनी केली आहे.
लाडक्या बहिणींचे पैसे बंद होता कामा नयेत. लाडक्या बहिणींनी स्वत: लाईनीत उभारून अर्ज भरले आहेत. त्यांना थांबवणं योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बीडच्या प्रकरणावर जयंत पाटलांनी प्रतिक्रीया देणं टाळलं. बीडच्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत जातात का विचारल्यावर या प्रकरणात आधीच टोकाची भूमिका घेण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले. देशमुख हत्या प्रकरणात पोलीस योग्य तपास करून योग्य माहिती पुढे आणतील. नेमका आका कोण हे आका शब्द आणणाऱ्याला विचारा असेही त्यांनी यावेळी म्हटले.
लाडक्या बहिणींची पडताळणी होणार Jayant Patil on Ladki Bhaeen Yojana ।
राज्यात जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून दरमहा दीड हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. आता, या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे, पण सरसकट स्क्रुटीनी होणार नाही. स्थानिक प्रशासनाकडून ज्या तक्रारी येतील त्यांच्यावर कारवाई होईल. चार चाकी गाड्या असणाऱ्या लाभधारकांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांजे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांची स्क्रुटीनी होण्याचा विषयच नाही, असेही तटकरे यांनी म्हटले.
आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहोत, 60 ते 70 टक्के लोक असे आहेत जे पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत, त्यांचे उत्त्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. ते या स्क्रुटीनीच्या निकषात नाहीत. ज्यांचं आधारकार्ड आणि बँक खाते नंबर मॅच होतं आहे, ते देखील स्क्रुटीनीमध्ये येणार नाहीत. कारण, त्यांचं उत्पन्न किती आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.





