जयंत पाटील अन् उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा ; नेमकी काय झाली चर्चा?, वाचा

Jayant Patil meet Uddhav Thackeray । विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने कमला लागले आहेत. त्यातच काल भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीत देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली आहे. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ती अजूनही गुलदस्त्यातच आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जागांच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीच सर्व काही ठिक नसल्याची चर्चा सुरु आहे. विदर्भातील जागांवरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसनेते वादाची ठिकणी पडल्याचं बोललं जात आहे. मात्र, यावर मार्ग काढू अशी माहिती नेते देत आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार,आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये जागावाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद Jayant Patil meet Uddhav Thackeray ।
दरम्यान, महाविकास आघाडीकडून महत्वाची बातमी समोर आली आहे. आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर होणार असल्याची शक्त्यात वर्तवण्यात येत आहे. कोणता पक्ष किती जागांवर लढणार याचा निर्णय आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे. आमचं सगळं ठरलं आहे. त्यामुळं उद्या जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली.
भाजपची पहिली यादी प्रसिद्ध Jayant Patil meet Uddhav Thackeray ।
भाजपने 99 जणांची यादी जाहीर करूनही महाविकास आघाडीमध्ये वाद असल्याची चर्चा रंगली आहे. विदर्भामधील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात घमासान सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील गुंता वाढत चालला आहे. महाविकास आघाडीकडून आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळं कोण किती जागा लढवणार हे आजच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा
जयंत पाटील अन् उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा ; नेमकी काय झाली चर्चा?, वाचा





