मोठी बातमी : जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी ; बंद दाराआड चर्चा

Jayant Patil meet Babajani Durrani । विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. एकीकडे सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असताना दुसरीकडे राज्यात जुने पक्ष एकत्र येणार का ? असा सवाल निर्माण होत आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय. त्याच पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांची त्यांच्या घरी जात भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जयंत पाटील – बाबाजानी दुर्रानी यांच्यात बंद दाराआड चर्चा Jayant Patil meet Babajani Durrani ।
अजितदादांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पाथरी येथील निवासस्थानी घरी जयंत पाटील दाखल झाले आहेत. त्यामुळे बाबाजानी दुर्रानी यांच्या शरद पवार गटात सामील होण्याच्या चर्चांना उधान आलंय. बाबाजानी दुर्रानी अजित पवार गटाचे विद्यमान परभणी जिल्हा अध्यक्ष आहेत. ते विधानपरिषदेचे सदस्य देखील आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार आहे. बाबाजानी दुर्रानी यांनी जयंत पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली आहे.
अजितदादांचा आणखी एक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात Jayant Patil meet Babajani Durrani ।
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ‘राजकारणात काहीही घडू शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकते, असं वक्तव्य अतुल बेनके यांनी केलं होतं.





