अर्शद वारसीने चित्रपटाला ‘बकवास’ म्हणताच जया बच्चन संतापल्या

Arshad Warsi And Jaya Bachchan | बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. एका मुलाखतीत अर्शद वारसीने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली आहे. ‘तुमचं मत कितीही प्रामाणिक असलं तरी तुम्ही ते मांडू शकत नाही’, अशी खंत अर्शद वारसीने मांडली आहे. एका चित्रपटाबाबत त्याने त्याचे स्पष्ट मत सांगितल्यावर जया बच्चन त्याच्यावर भडकल्या असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.
“एकदा जयाजी यांनी मला चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी बोलावलं. त्यांनी मला स्क्रिनिंगनंतर चित्रपट कसा वाटला असं विचारलं. त्यावर मी ‘फारच बकवास’ असं उत्तर दिलं. यानंतर त्यांनी मला एका कोपऱ्यात नेलं आणि ‘तुझं मत तुझ्यापुरतं मर्यादित ठेव’ असं सांगितलं. तुम्हाला या गोष्टींमधून धडा मिळत असत की, तुम्ही येथे तुमचं प्रामाणिक मत मांडूच शकत नाही. तुम्हाला सत्य बोलण्याची परवानगी नाही. मग तो चित्रपट कितीही वाईट असला तरी फरक पडत नाही”, असे अर्शदने यावेळी सांगितले. Arshad Warsi And Jaya Bachchan |
दरम्यान, अर्शदने 1996 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यादरम्यानची आठवण सांगताना अर्शद म्हणाला की, “मी चित्रपटसृष्टीत नवीन होतो आणि माझे ज्ञान शून्य होतं. ‘तेरे मेरे सपने’ या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्हाला हैदराबादला जावे लागले. मी चड्डी आणि बनियान घालून फ्लाइटमध्ये बसलो. आम्ही डान्सर असल्याने पूर्वी असे कपडे घालायचो. जेव्हा जयाजींना हे कळले तेव्हा अर्शद वारसीला प्रवास करताना योग्य कपडे घालण्यास सांगा, असा संदेश पाठवला. ” Arshad Warsi And Jaya Bachchan |
अर्शदच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, ‘होगी प्यार की जीत’, ‘मेरे दो अनमोल रत्न’, ‘जानी दुश्मन: एक अनोखी कहानी’, ‘कुछ मीठा हो जाए’, ‘मैने प्यार क्यूं किया’, ‘धमाल’, या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. अर्शद वारसी ‘बच्चन पांडे’ चित्रपटात अखेरचा दिसला होता. आता तो लवकरच ‘जॉली LLB3″ मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा:
‘मी दु:खी अंत:करणाने…’ राज्यसभेत अचानक असे काय घडले की सभापती धनखड खुर्चीवरून उठून निघून गेले ..





