Jaya Bachchan । जया बच्चन यांचा खुलासा,’मला अभिनेत्री नव्हे तर सैन्यात भरती व्हायचं होतं पण…’

Jaya Bachchan । अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तिच्या पॉडकास्ट शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये अमिताभ यांच्या पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा त्यांच्या कुटुंबाविषयीचे किस्से शेअर करतांना दिसत आहे. आता याच शोमध्ये जया बच्चन यांनी खुलासा केला आहे की, ‘त्यांना अभिनेत्री नव्हे तर सैन्यात भरती व्हायचे होते. शोमध्ये या तिघीनींही आपले अनुभव शेअर केले आणि लिंगाच्या नावाखाली स्टिरियोटाईप कसे पसरवले जातात हे सांगितले.’
पुढे संभाषणात, तिच्या आई जया बच्चन यांच्या फिल्मी करिअरबद्दल बोलताना श्वेता म्हणते की, ‘तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिची आई (जया) चित्रपटात नव्हे तर आर्मीमध्ये जॉईन व्हायची होती.
यावर जया बच्चन म्हणाल्या, ‘हो, मला आठवतंय… त्यावेळी मला सैन्यात भरती व्हायचं होतं, पण मला ते जमलं नाही ज्यामुळे मी खूप निराश झाले होते. त्यावेळी सैन्यात महिलांना केवळ नर्स म्हणूनच भरती केलं जायचं. अभिनयापेक्षा मला सैन्यात भरती होण्याचे तेव्हा वेध लागले होते.” जया बच्चन यांच्याच म्हणण्याला दुजोरा देत श्वेता बच्चननेही स्त्री-पुरुष यांच्यात होणाऱ्या भेदभावाबद्दल भाष्य केलं.
जया बच्चन सध्या कमी चित्रपट करतात पण त्या राजकारणात खूप सक्रिय आहे. अभिनयासोबतच जया यांची राजकीय कारकीर्दही बरीच यशस्वी ठरली आहे. 2004 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर जया बच्चन या अनेकवेळा राज्यसभेची खासदार बनल्या आहे. जया आपल्या स्पष्टवक्ते शैलीसाठीही ओळखल्या जातात, कोणत्याही मुद्द्यावर बोलताना त्या अजिबात संकोच करत नाहीत.
हेही वाचा
काय सांगता…! राजकीय पक्षांनी केला कंडोमच्या पाकिटांवरून प्रचार; मतदार पडले संभ्रमात





