१५ वर्ष सोबत असलेल्या ‘जॅाय’चे निधन, अभिनेत्री नेहा शर्माची भावूक पोस्ट म्हणाली,” जॅाय आमच्या घरातील सदस्य…”

Actress Neha Sharma : अभिनेत्री नेहा शर्माला खूप मोठा धक्का बसला आहे. तिच्या १५ वर्षांपासून तिच्या सोबत असलेल्या ‘जॅाय’चे निधन झाले आहे. नुकतीच नेहाने याविषयीची एक पोस्ट इन्स्टावर शेअर करत जॅाय या तिच्या पाळीव श्वानाचे निधन झाल्याची बातमी दिली आहे. जॉय गेल्या १५ वर्षांपासून तिच्यासोबत आहे, पण आता तो या जगात नाही, अशी भावूक पोस्ट तिने इन्स्टावर शेअर केली आहे. जॅायच्या जाण्याने नेहा दुःखी झाली आहे. जॅायबद्दलच्या भावना तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.
नेहाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, गेल्या आठवडा तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणांपैकी एक होता. जॉयच्या जाण्यामुळे तिने तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग गमावला आहे, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. शिवाय नेहा जॉयला तिचे ‘बाळ’ म्हणत असायची. जॉय फक्त एक पाळीव प्राणी नव्हती, तर कुटुंबातील एक सदस्य होती जी काहीही न बोलता सर्वकाही समजून घेत असे.
View this post on Instagram
तिने ज्यांना स्पर्श केला त्या प्रत्येकाचे आयुष्य आनंदाने बहरत गेले. ती एक जादू होती, जी अजूनही कुठेतरी आपल्यासोबत आहे- फक्त आता ती एका वेगळ्या स्वरूपात आहे. असे देखील तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्या नसल्याने घर रिकामे वाटत असल्याची खंत देखील तिने व्यक्त केली. आम्हाला तिची आठवण शब्दांत सांगता येणार नाही, इतकी येत राहिल. ती केवळ आमच्यासोबत राहिली नाही, तर तिने आमची काळजी घेतली आणि आता आम्ही तिच्या आठवणी कायम आमच्यासोबत घेऊन जाऊ.’ असे देखील ती म्हणाली.
नेहाची बहीण आणि अभिनेत्री आयशा शर्मानेही इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जॉयसोबत घालवलेल्या आनंदी क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. नेहा शर्मा शेवटची २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘३६ डेज’ या वेब सिरीजमध्ये दिसली होती. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. या सिरीजमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आणि तिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचाः प्रेमाची गोष्ट फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळेच्या कारचा मोठा अपघात; झोप लागली अन्…; व्हिडिओ पाहा





