Jay Shah Chairman : जागतिक क्रिकेटवर पुन्हा भारताचाच डंका! जय शाह यांची सलग दुसऱ्यांदा आयसीसी चेअरमनपदी बिनविरोध निवड
Jay Shah 2nd Time ICC Chairman :जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा पुनर्निवड झाली आहे. बाली येथे झालेल्या आयसीसीच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत, सर्व सदस्यांनी त्यांच्या पुनर्निवडीच्या बाजूने मतदान केले आणि समितीनेही त्यांना बिनविरोध निवडले.

Jay Shah Re-elected ICC Chairman Unopposed Second Term Bali Meeting : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) चेअरमनपदी जय शाह यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. हा त्यांचा सलग दुसरा कार्यकाळ असणार आहे. इंडोनेशियातील बाली येथे पार पडलेल्या आयसीसी बोर्ड आणि समितीच्या महत्त्वाच्या बैठकीत सर्व संचालकांनी एकमताने त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या विरोधात इतर कोणताही उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने, त्यांची बिनविरोध फेरनिवड अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली.
आयसीसी बोर्डाकडून नेतृत्वावर विश्वास; खेळाच्या जागतिक विस्ताराचे ध्येय
या फेरनिवडीची घोषणा करताना आयसीसीने आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून जय शाह यांचे अभिनंदन केले. जगभरात क्रिकेट खेळाचा वेगाने विस्तार करणे, जागतिक स्तरावर चाहत्यांची संख्या वाढवणे आणि भविष्यातील धोरणात्मक योजनांद्वारे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे, या क्रिकेटच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर बोर्डाने त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ मुळे क्रिकेटला नवी सुवर्णसंधी; जय शाह
The International Cricket Council (ICC) Board is delighted to announce the unopposed reappointment of Mr Jay Shah for a second term as ICC Chair, following a proposal by the ICC Directors at the Board and Committee meetings in Bali.
This decision reflects the Board’s confidence in Shah’s leadership and provides continuity at a defining moment for the sport, with global expansion, growth in fandom and commercial development on the strategic roadmap for its future.
ICC Chairman Jay Shah said:
“I am deeply honoured by the confidence the ICC Board has placed in me and sincerely grateful to every Director for their continued trust and support. Serving as Chair of the ICC is both a privilege and a responsibility, and I remain committed to working with our Members to advance the interests of cricket across the world.
“We are entering one of the most important and exciting periods in our sport’s history. Cricket’s return to the Olympic Games at LA28 presents an extraordinary opportunity to introduce our game to new audiences and inspire a new generation of players and fans.
“Our responsibility extends well beyond delivering successful events. We must build a stronger and more sustainable future for the sport with a focus on fans, athletes, commercial partners and other key stakeholders.
“I have always believed that cricket’s greatest strength lies in its ability to bring people together. With the support of the Board and our Members, our focus will be on turning ambition into action and ensuring that the progress we make leaves a lasting legacy for generations to come.”
More: https://t.co/Xs4sidFvOU
— ICC (@ICC) November 16, 2026
फेरनिवडीनंतर जय शाह म्हणाले की, या सर्वोच्च पदावर काम करणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे. जागतिक क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी सर्व सदस्य देशांसोबत मिळून काम करेन. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा ऐतिहासिक समावेश झाल्यामुळे नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. केवळ मोठ्या स्पर्धांचे आयोजनच नव्हे, तर खेळाडू, चाहते आणि व्यावसायिक भागीदारांचे हित जपत क्रिकेटचे भविष्य भक्कम करणे हे माझे मुख्य ध्येय असेल.
सर्वात तरुण आयसीसी प्रमुख होण्याचा विक्रम; पाचवे भारतीय चेअरमन
Congratulations to Mr Jay Shah who has been reappointed unopposed for a second term as ICC Chairman at the global governing body’s Board meetings in Bali.
May you continue to achieve success in your endeavours and take cricket to greater heights across all spheres.
@JayShah https://t.co/fHtdyLiua3
— BCCI (@BCCI) November 16, 2026
जय शाह २०२४ मध्ये वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांच्या जागी सर्वात तरुण आयसीसी चेअरमन बनले होते. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर आयसीसीचे प्रमुखपद भूषवणारे ते पाचवे भारतीय ठरले आहेत. २०१५ पूर्वी या पदाला प्रेसिडेंट म्हटले जात असे.





