Jay Shah ICC New Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी (Chairman) निवड झाली आहे. ICC चे अध्यक्ष (Chairman) बनणारे ते सर्वात तरुण भारतीय असतील. जय शहा वयाच्या 36 व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. जय शहापूर्वी भारतातील इतर दिग्गजांनी हे पद भूषवले होते. महत्त्वाची बाब म्हणजे जय शहा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आता ते 1 डिसेंबरला पदभार स्वीकारतील. यासाठी जय शाह यांना बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागणार आहे.
आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष (Chairman) न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आहेत. त्यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपत आहे. यानंतर जय शहा हे पद स्वीकारतील. 20 ऑगस्ट रोजी आयसीसीने याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. बार्कले हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. 2020 पासून ते या पदावर होते.
Jay Shah has been elected unopposed as the next Independent Chair of the ICC.https://t.co/Len6DO9xlE
— ICC (@ICC) August 27, 2024
जय शाह यांच्या आधी चार भारतीय आयसीसीचे अध्यक्ष होते. जगमोहन दालमिया 1997 ते 2000 पर्यंत ICC चे अध्यक्ष होते. त्यानंतर 2010 ते 2012 पर्यंत शरद पवार तर एन श्रीनिवासन 2014-15 मध्ये अध्यक्ष होते. शशांक मनोहर 2015-2020 पर्यंत अध्यक्ष होते. वास्तविक, 2015 पूर्वी आयसीसी प्रमुखांना अध्यक्ष म्हटले जायचे. मात्र यानंतर त्यांना चेअरमन म्हटले जाऊ लागले.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी शहा बीसीसीआयच्या सचिव पद सोडण्याची शक्यता आहे. जय शहा हे सध्या आयसीसीच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नामांकन मिळाल्याने मी नम्र झालो असल्याचे जय शहा यांनी म्हटले आहे.
जय शहा यांची बिनविरोध निवड
जर आपण जय शाहबद्दल बोललो तर ते 2019 मध्ये प्रथमच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांदा हे पद भूषवले. आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या समर्थनार्थ 15 सदस्य होते. जर आपण आयसीसीच्या नियमांवर नजर टाकली तर अध्यक्ष निवडीसाठी 16 संचालक मतदान करतात. अशा स्थितीत 9 मते मिळणे आवश्यक असते. अध्यक्षपदासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते.