BCCI Domestic Cricket : आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे खेळाडू होणार मालामाल, सचिव जय शाहांची मोठी घोषणा…

Prize Money For Domestic Cricket Programme – सर्व महिला आणि कनिष्ठ स्तरीय क्रिकेटमध्ये सामनावीर व मालिकावीर पुरस्कार मिळविणाऱ्या खेळाडूंना बक्षीस रक्कम दिली जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आज आपल्या पोस्टद्वारे केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंचा सहभाग वाढावा यासाठी हे महत्वाचे पाऊल असणार आहे.
याचबरोबरीने वरिष्ठ गटाच्या दोन महत्वाच्या स्पर्धा विजय हजारे करंडक व सय्यद मुश्ताक अली टी-20 या स्पर्धातील सामानावीराना देखील पुरस्कार व बक्षिसाची रक्कम देण्यात येणार आहे. रणजी करंडक स्पर्धेत बक्षिसाची रक्कम आधीपासून देण्यात येत होती.
देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या नवीन खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळेल व त्यामुळे बीसीसीआयला या खेळाडूंची देखील ओळख होणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगताना हा निर्णय घेतल्याबद्दल बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेचे त्यांनी आभार मानले.
We are introducing prize money for the Player of the Match and Player of the Tournament in all Women’s and Junior Cricket tournaments under our Domestic Cricket Programme. Additionally, prize money will be awarded for the Player of the Match in the Vijay Hazare and Syed Mushtaq…
— Jay Shah (@JayShah) August 26, 2024
यापूर्वी देखील जय शहा यांनी देशांतर्गत क्रिकेटला चालना देण्यासाठी पाऊले उचलली होती. वरिष्ठ खेळाडूंना देखील दुखापतीनंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक केले होते. याचबरोबरीने या खेळाडूची कमाई कशाप्रकारे वाढेल यावर देखील जय शहा यांनी धाडसी निर्णय घेतले होते. यामध्ये खेळाडूंच्या सामान्यांच्या रकमेत देखील वाढ करण्यात आली होती.
मंडळाने यापूर्वीही उचलले आहे असे पाऊल…
गेल्या वर्षी बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ केली होती आणि रणजी करंडक विजेत्याला 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले होते. इराणी चषकाचे रोख बक्षीसही दुप्पट करण्यात आले असून विजेत्यांना 25 लाखांऐवजी 50 लाख रुपये आणि उपविजेत्याला 25 लाख रुपये देण्यात आले होते. दुलीप ट्रॉफीमध्ये, चॅम्पियन्सला आता 1 कोटी रुपये आणि उपविजेत्याला 50 लाख रुपये मिळतात, तर विजय हजारे ट्रॉफीच्या विजेत्याला 1 कोटी रुपये आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला 50 लाख रुपये मिळतात.





