नक्षलवाद्यांबरोबरच्या चकमकीत जवान शहीद
Updated On:

नारायणपूर – छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत जिल्हा राखीव पोलीस दलाचा एक जवान आज शहीद झाला तर दुसरा जवान गंभीर जखमी झाला आहे. तादूर गावात आज सकाळी नक्षलवादी व सुरक्षा जवानांची समोरासमोर गाठ पडली त्यावेळी ही चकमक झाली.
या भागात बंदोबस्तासाठी आलेल्या पथकावर नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला. त्यावेळी जवानांकडूनही प्रतिगोळीबार करून प्रत्युत्तर देण्यात आले पण तो पर्यंत दोन जवान जखमी होऊन पडले होते. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले त्यावेळी संतू वड्डूे नावाचा जवान शहीद झाला.
गोळीबार करणारे नक्षलवादी नंतर पळून गेले. त्यांच्यापैकी एकही जण जवानांच्या हाती लागला नाही. पण त्या भागातील सुरक्षा बंदोबस्त वाढवून त्यांचा आता शोध सुरू करण्यात आला आहे.





