Javed Akhtar: “औकातीत रहा…”, जावेद अख्तरांच ट्रोलर्सना सडेतोड प्रतिउत्तर

Javed Akhtar: भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी देशवासियांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. या संदेशात त्यांनी स्वातंत्र्य सहज मिळालेली नाही, तर हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या पोस्टवर एका ट्रोलने अपमानास्पद कॉमेंट्स करत लिहिले, “तुम्ही १४ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करा”.
या वक्तव्यावर अख्तर भडकले आणि त्यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले,
“बेटा, जेव्हा तुझे बाप-आजोबा इंग्रजांचे बूट चाटत होते, तेव्हा माझे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘काळ्या पाण्यात’ प्राण देत होते. औकातीत रहा.”
‘काळे पाणी’ म्हणजे अंडमान बेटांवरील कुप्रसिद्ध सेलुलर जेल, जिथे स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिशांनी कठोर शिक्षा दिली होती.
जावेद अख्तर यांचे पणजोबा फजल-ए-हक खैराबादी (१७९७–१८६१) हे कवी, इस्लामी विद्वान व स्वातंत्र्यसैनिक होते. १८५७ च्या उठावात ब्रिटिशांविरुद्ध फतवा जारी केल्याने त्यांना अंडमानला निर्वासित करण्यात आले, जिथे त्यांचे निधन झाले. तर त्यांचे आजोबा मुज्तर खैराबादी आणि वडील जान निसार अख्तर हेही प्रसिद्ध कवी होते.
जावेद अख्तर यांच्या या कठोर उत्तराची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून अनेकांनी त्यांच्या ठाम भूमिकेचे कौतुक केले आहे.





