“मी शांत आहे याचा अर्थ…” ऐश्वर्या शर्माने घटस्फोटाच्या चर्चांवर सोडले मौन

Aishwarya Sharma | अभिनेत्री ऐश्वर्या शर्मानं छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तिच्या आणि नील भटच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. ऐश्वर्या शर्मा आणि नील भट यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला असून घटस्फोटाचं कारणं समोर आलेलं नसल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र या चुकीच्या वृत्तांबद्दल तिने स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे.
ऐश्वर्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “लोक माझ्याबद्दल आपापल्या पद्धतीनं मत बनवत आहेत. मी काय केलं आणि मी कोण आहे, याबद्दल समजून न घेता काहीही बोलत आहेत. काही लोक तर ‘हे कर्म आहे’ असंही म्हणत आहेत. पण, याआधी जे माझ्याबरोबर प्रत्यक्षात काम करत आहेत त्यांच्याशी बोला, माझ्या सहकलाकारांशी बोला, माझ्या निर्मात्यांशी बोला, सेटवरील कोणाशीही बोला आणि त्यांना विचारा की मी कधीही कोणाला त्रास दिलाय का? कुणाची निंदा केली का? किंवा कुणाला दुखावलंय का? नाही.. कधीच नाही. सेटवर मी माझं प्रोफेशनलिझम कायम ठेवलं आहे.”
पुढे ऐश्वर्या लिहिते की, “जेव्हापासून मी साखरपुडा केला, तेव्हापासून मी सतत ट्रोल होत आहे आणि मी ते हसत-हसत सहन केलं. मला त्रास झाला आहे, पण त्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. हे सर्व लोकांना का दिसत नाही? त्याचबरोबर काही अनोळखी लोक मला मेसेज आणि यूट्यूब लिंक पाठवत आहेत, ज्यात माझं नाव काही खोट्या गोष्टींशी जोडलं जात आहे, पण हे खरं नाही. मी शांत राहिले कारण प्रत्येकवेळी जेव्हा मी काही बोलते, तेव्हा लोक माझं एखादं वाक्य चुकीच्या पद्धतीनं घेतात.” Aishwarya Sharma |
कोणाबद्दलही काही चुकीचं बोलण्याआधी विचार करा
“फुकटच्या प्रसिद्धीसाठी माझं नाव वापरतात आणि ते पुन्हा असंच करणार. पण, मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की मी चुकीची आहे, त्याचा अर्थ फक्त इतकाच आहे की मी नकारात्मकता पसरवू इच्छित नाही. मी हे स्पष्टपणे सांगू इच्छिते, मी कधीही कोणाला त्रास दिला नाही. जे लोक खोटी माहिती पसरवत आहेत त्यांना त्यांच्या कर्माचा विचार करायला हवा. तुम्ही मानसिक आरोग्याबद्दल बोलता. पण, कोणाबद्दलही काही चुकीचं बोलण्याआधी विचार करा. काही लोक शांत राहण्याचा निर्णय घेतात आणि मीसुद्धा तेच केलं आहे. पण मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलू शकता, मी माझ्या स्वाभिमानासाठी स्वत: उभी राहीन.” Aishwarya Sharma |
दरम्यान, ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत ऐश्वर्या शर्माची नील भट्टसोबत भेट झाली. त्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केले. त्यानंतर दोघांनी बिग बॉसच्या घरात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांच्या जोडीची चांगलीच चर्चा रंगली होती.
हेही वाचा:





