बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणवर जावेद अख्तर संतापले म्हणाले,’हा तर निवळ मूर्खपणाचं’

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकासह , सारा अली खान , श्रद्धा कपूर , रकूल प्रीत सिंग नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिकासह सारा अली खान , श्रद्धा कपूर , चौकशी करणार आहे. तर शुक्रवारी रकुलची एनसीबीकडून चौकशी केली गेली.
दरम्यान, बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणबाबत एनसीबीकडून होत असलेल्या चौकशीवर गीतकार आणि लेखऱ जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले जावेद अख्तर
‘मी १९६५ पासून इंडस्ट्रीत आहे. आजची पिढी जितकी आरोग्याची काळजी घेतं तेवढं कोणीच नव्हतं . आजच्या मुला-मुलींना पाहिलं तर ते फिजिकली किती फिट आहेत. दिवसातले दोन ते तीन तास ते व्यायाम करत असतात. एकदम स्लीम, फिट, एकही फॅट जास्त नाही. हे तुम्हाला ड्रग्ज व्यसनी वाटतयात. जे ड्रग्ज घेतात त्यांना दुरुनही ओळखता येतं. ही आजकालची मुलं एवढी फिट आहेत की त्यांना ड्रग्जचं व्यसन आहे म्हणणं हा तरनिवळ मूर्खपणाचं आहे.’





