IND vs AUS 3rd Test | जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, कपिल देवचा महान विक्रम काढला मोडित….

IND vs AUS 3rd Test (Jasprit Bumrah) | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळवला जात आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पावसाने खेळात व्यत्यय आणला नाही आणि पूर्ण खेळ पार पडला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. असे असतानाही भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. त्याने कपिल देव यांचा महान विक्रम मोडित काढला आहे.
जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रम…
दुसऱ्या दिवशी भारताकडून फक्त जसप्रीत बुमराहची ताकद दिसून आली. जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करत पाच बळी घेतले. आपल्या गोलंदाजीने त्याने ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेनसारख्या बड्या फलंदाजांना बाद केले. बुमराह आता आशियाबाहेर सर्वाधिक वेळा पाच बळी ( five-wicket haul ) घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.
Ten of Jasprit Bumrah’s 12 Test five-fors have come outside Asia! #AUSvIND pic.twitter.com/I1xnEXjfcr
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 15, 2024
या बाबतीत त्याने माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांना पिछाडीवर टाकले आहे. बुमराहने आशियाबाहेर 10 वेळा पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे, तर कपिल देवने 9 वेळा अशी कामगिरी केली आहे. यासह बुमराहनं दिग्गज कपिल देव यांना मागे टाकत इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले आहे.
IND vs AUS 3rd Test | हेड-स्मिथची दमदार शतके, गाबा कसोटीचा दुसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावे…
Five-Wicket Haul : अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू…
या सामन्यात जसप्रीतच्या नावावर आणखी एका मोठ्या कामगिरीची नोंद झाली आहे. कसोटीत सर्वाधिक पाच बळी (Five-Wicket Haul) घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या नावावर 12 वेळा 5 विकेट घेण्याची नोंद झाली आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक 5 बळी घेण्याचा पराक्रम कपिल देवने केला होता. त्याने 23 वेळा अशी कामगिरी केली आहे. या यादीत आता बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे तर झहीर खानचे नाव तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 11 वेळा ही कामगिरी केली आहे. याशिवाय इशांत शर्मा या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने 11 वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.





