Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. बुमराह हा आतापर्यंत टेस्ट गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स मिळवणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी तो भारताचा माजी स्पिनर गोलंदाज आर.अश्विन सोबत 904 रेटिंग पॉइंट्सवर होता. परंतु आता त्याने आर अश्विनला देखील मागे सोडलं आहे.
जसप्रीत बुमराहने 2018 रोजी साऊथ आफ्रिकेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. बुमराह बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वात खतरनाक गोलंदाज आहे. त्याने सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यात 30 विकेट घेतल्या आहेत. बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. सिडनीतील पाचव्या टेस्टमध्ये देखील बुमराह ऐतिहासिक कामगिरी करू शकतो.
‘ही’ कामगिरी करणार
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सिरीजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्यासाठी बुमराहला फक्त तीन विकेट्सची गरज आहे. सध्या हा विक्रम हरभजन सिंहच्या नावावर आहे. हरभजनने 2000-01 च्या मालिकेत 32 विकेट्स घेतल्या होत्या तर बुमराहने चार सामन्यात 30 विकेट घेतल्या होत्या.
कधी आणि कुठे पाहणार सिडनी टेस्ट?
3 ते 7 जानेवारी दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना हा सिडनी येथे पार पडणार आहे. हा टेस्ट सामना तुम्हाला टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टार केले जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होणार आहे.





