अधिवेशात मराठा आरक्षणावर विधेयक मंजूर ; मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया…

Jarange on Maratha Reservation। राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केलं आणि हे विधेयक एकमताने मंजूर झाले.आता मुख्यमंत्री हे विधेयक विधान परिषदेत मांडणार आहेत. दरम्यान, या विधेयकावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हे आरक्षण आम्हाला मान्य नाही Jarange on Maratha Reservation।
मराठा आरक्षणाच्या विधेयकावर बोलताना, ‘ राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत करतो. पण हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. आम्ही इथून आधीही स्वागत केलं होतं. आताही स्वागत करतो. आमचं म्हणणं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण द्या. सगेसोयरेची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. आधीही सांगितलं होतं की हे नाकारण्याचा काही कारणच नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
उपचार घेण्यास नकार Jarange on Maratha Reservation।
मनोज जरांगे यांनी सरकारने संमत केलेल्या विधेयकानंतर आता जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. तसेच आता पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचे सांगितले. यावेळी हाताला असलेली सलाईन त्यांनी काढून टाकली. मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोवर उपचार घेणार नसल्याचं जरांगे म्हणाले. त्यासोबतच आता उद्या पुन्हा एकदा आपली पुढच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवणार असल्याचे म्हटले.
दरम्यान, विधेयकाचा मसूदा समोर आला होता त्यावेळी जरांगे यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला होता. त्यांनी आम्हाला वेगळे ताट कशाला वाढता? आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केली होती. तसेच राज्य सरकार आमच्या सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी कधी करणार? अधिसूचनेची अंमलबजावणी करायचीच नव्हती तर अधिवेशन कशाला घेतलं? राज्य सरकार विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत आरक्षण देत आहे. हे आरक्षण आमच्यावर थोपवले जात आहे.” असे म्हटले.





