Tokyo Olympics : तेरा वर्षांच्या मुलींनी रचला इतिहास
Updated On:

टोकियो – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या स्केटबोर्ड स्पर्धेत अवघ्या 13 वर्षांच्या दोन मुलींनी ऐतिहासिक कामगिरी केली. यजमान जपानच्या मोमीजी निशिया आणि ब्राझीलच्या रेसा लीलने स्केटबोर्ड स्ट्रीट स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रजतपदकाची कमाई केली.
मोमीजी निशिया ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वांत लहान वयाची वैयक्तिक ऑलिम्पिक पदकविजेती ठरली आहे.
तिने सोमवारी 13 वर्षे आणि 330 दिवस वयात सुवर्णपदक जिंकले, तर ब्राझीलच्या निशियाने 13 वर्षे 203 दिवस वात रजतपदकाची नोंद केली.





