जपान पुन्हा हादरला; ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

Earthquake In Japan | जपानमध्ये पुन्हा एकदा भुकंपाचे धक्के बसले आहेत. गुरुवारी जपानच्या दक्षिण किनारपट्टीला 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे धक्के अनेक शहरांमध्ये जाणवले आहेत. भूकंपानंतर जपानने त्सुनामीचाही इशारा दिला आहे. प्राथमिक अहवालानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू निचिनानपासून 20 किमी उत्तर-पूर्वेस 25 किमी खोलीवर होता.
त्सुनामीचा इशारा
त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर संपूर्ण जपानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जपानमध्ये भूकंपाचे हे तीव्र झटके क्यूशू आणि शिकोकू बेटांवर जाणवले. भूकंपासोबतच जपानमधील मियाजाकी, कोटी, इहिमे, कागोशिमा आणि आइता येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. Earthquake In Japan |
भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिल्याने अधिकाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे. जपानमधील मियासाकीजवळील क्युशू या दक्षिणेकडील बेटावर 7.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त आहे. जपान हवामान संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, दक्षिणेकडील किनारपट्टीला जवळपास १ मीटरच्या लाटांची त्सुनामी धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, शेकडो बेटांवर वसलेल्या जपानमध्ये सातत्याने भूकंप येत असतात. तसेच समुद्रात भूकंप झाल्यानंतर त्सुनामी येऊन किनारी भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. Earthquake In Japan |
40 minutes Ago a 7.1 #Magnitude #Earthquake hit the southern #Japanese island of #Kyushu near #Miyasaki
Multiple Damages are Reported and a #tsunami warning is Aktive
Multiple Aftershocks are expected
Please stay safe and Follow the instructions #Japan #sge #tokyo #NHK pic.twitter.com/UtARM67MyW
— Fanatico Football (@fanatico_japan) August 8, 2024
जानेवारीमध्ये झालेल्या भूकंपामुळे 318 लोकांचा मृत्यू
वर्षाच्या सुरुवातीला, १ जानेवारीला जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ज्यामध्ये 318 लोकांचा मृत्यू झाला तर 1300 लोक जखमी झाले. या भूकंपामुळे इशिकावा येथे अनेक ठिकाणी आग लागली, त्यामुळे 200 इमारती जळून खाक झाल्या.
हेही वाचा:
‘वक्फ दुरुस्ती विधेयक’ मांडताच गदारोळ; अखिलेश यादव अमित शाह यांच्यात शाब्दिक चकमक





