Jantar Mantar: जंतर मंतरवर हिंसाचार घडवण्याचा डाव? पाकिस्तानी नेटवर्कचा पर्दाफाश, ९ संशयित अटकेत
Jantar Mantar: अमृतसर आयुक्तालय पोलिसांनी आयएसआय-समर्थित दोन दहशतवादी गटांचा पर्दाफाश केला आहे.

Jantar Mantar: अमृतसर आयुक्तालय पोलिसांनी आयएसआय-समर्थित दोन दहशतवादी गटांचा पर्दाफाश केला आहे. त्यासोबतच चार अल्पवयीन व पाच प्रौढांसह एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
पेट्रोल बॉम्ब गटातील बहुतेक सदस्य अल्पवयीन होते. या गटाचे आठ सदस्य जंतर मंतर याठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणीही गेले होते, ज्याठिकाणी त्यांना पेट्रोल बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह स्थानिक पातळीवर रसद पुरवल्याचा आरोप आहे.
पाकिस्तानने रचला होता कट Jantar Mantar:
पोलिसांचा असा विश्वास आहे की, ही मदत पाकिस्तानस्थित आयएसआयच्या एका हँडलरने पुरवली होती. अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर म्हणाले, “आयएसआय-समर्थित दोन दहशतवादी गटांचा पर्दाफाश करण्यात आला असून त्यांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
चार अल्पवयीन आणि पाच प्रौढांसह एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक गट रेल्वे रुळांवर कॅमेरे बसवत होता. या कॅमेऱ्यांचे फुटेज सीमेपलीकडे पाठवायचे होते.
Amritsar, Punjab: On busting ISI-backed terror modules, Police Commissioner Gurpreet Singh Bhullar says, “The Amritsar Commissionerate Police, acting under the Punjab Chief Minister’s zero-tolerance policy towards terrorism, has busted and completely dismantled two ISI-backed… pic.twitter.com/byhfAc9LK4
— IANS (@ians_india) August 5, 2026
पोलिसांना वेळेवर माहिती मिळाली आणि त्यांनी आरोपींना कॅमेऱ्यांसह अटक केली. कॅमेरे आणि इतर खर्चाची व्यवस्था हवालामार्फत करण्यात आली होती.”
पेट्रोल बॉम्ब फेकण्याचे प्रशिक्षण Jantar Mantar:
दुसऱ्या गटाला आयएसआयच्या हँडलर्सनी पेट्रोल बॉम्ब बनवण्याचे आणि फेकण्याचे प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षणादरम्यान, त्यांना पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांवरील हल्ल्यांची टेहळणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
या आठ व्यक्तींनी जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनातही सहभाग घेतला. त्यांना स्थानिक पाठिंबा पुरवण्यात आला. त्यांना पेट्रोल बॉम्ब आणि इतर साहित्यही पुरवण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव ते आपल्या योजना पार पाडू शकले नाहीत. हे एक मोठे यश आहे.





