Janki Bodiwala: ‘शैतान’च्या भूमिकेने शरीर थकून गेले; जेन Z हीच सर्वात परफेक्ट पिढी… अभिनेत्री जानकी बोडीवाला
Janki Bodiwala जानकीने सांगितले की ती सुरुवातीला डेंटिस्ट होण्यासाठी शिक्षण घेत होती. ती डेंटिस्ट्रीच्या पहिल्या वर्षात शिकत असताना अचानक अभिनयाची संधी मिळाली. तिच्या वडिलांना चित्रपटांची खूप आवड होती.

Janki Bodiwala: गुजराती चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री जानकी बोडीवाला (Janki Bodiwala) आता बॉलिवूडमध्येही ठसा उमटवत आहे. गुजराती चित्रपट वश मधील दमदार अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या जानकीने हिंदी चित्रपट शैतान आणि नुकत्याच आलेल्या मर्दानी ३ मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. एका खास मुलाखतीत तिने तिच्या अभिनय प्रवासाबरोबरच जेन Z पिढीबद्दलही आपले मत व्यक्त केले.
जानकीने सांगितले की ती सुरुवातीला डेंटिस्ट होण्यासाठी शिक्षण घेत होती. ती डेंटिस्ट्रीच्या पहिल्या वर्षात शिकत असताना अचानक अभिनयाची संधी मिळाली. तिच्या वडिलांना चित्रपटांची खूप आवड होती. त्यांच्या घरात छोटंसं मिनी थिएटरही आहे. लहानपणापासूनच घरी दर शुक्रवारी चित्रपट पाहण्याची सवय असल्यामुळे नकळत तिचा सिनेमा जगताशी संबंध जोडला गेला. Janki Bodiwala

Janki Bodiwala
ती सांगते की, डेंटिस्ट्रीच्या शिक्षणादरम्यान सुट्टी असताना वडिलांनी तिला एका चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास सांगितले. सुरुवातीला तिला थोडे आश्चर्य वाटले, पण नवीन अनुभव म्हणून तिने ऑडिशन दिले. त्या वेळी तिचे ऑडिशन फार खास झाले नव्हते. तरीही दिग्दर्शक कृष्णदेव याज्ञनिक यांनी तिच्यात काहीतरी वेगळे पाहिले आणि तिला प्रशिक्षण देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर तिने छेलो दिवस हा चित्रपट केला आणि त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर तिचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. Janki Bodiwala
जानकीने वश आणि त्याच्या हिंदी रिमेक शैतान या दोन्ही चित्रपटांत एकाच प्रकारची तीव्र भूमिका साकारली. या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली की हा अनुभव खूप आव्हानात्मक होता. त्या भूमिकेची तीव्रता इतकी होती की शूटिंगदरम्यान तिच्यावर शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा ताण आला. Janki Bodiwala
View this post on Instagram
ती सांगते की शूटिंगदरम्यान एकदा १० ते १५ दिवसांचा ब्रेक मिळाला होता. सुरुवातीला ती नाराज झाली होती, कारण कामाचा वेग चांगला सुरू होता. पण काही दिवसांतच तिला जाणवले की तिचे शरीर खूप थकले आहे. प्रीक्लायमॅक्सपर्यंतच्या शूटिंगनंतर ती पूर्णपणे थकून गेली होती. त्यामुळे त्या ब्रेकमुळेच क्लायमॅक्समध्ये ती योग्य ती ऊर्जा देऊ शकली. तिच्या म्हणण्यानुसार, त्या भूमिकेने तिचे शरीर अक्षरशः थकवून टाकले होते. Janki Bodiwala
मर्दानी ३ या चित्रपटाबद्दल बोलताना जानकी म्हणाली की मुलींच्या तस्करीसारख्या गंभीर विषयांवर आधारित कथा ऐकताना किंवा वाचताना खूप राग आणि भीती वाटते. अशा घटना खूप वेदनादायी असतात. त्यामुळे आजच्या काळात महिलांनी अधिक मजबूत आणि आत्मविश्वासू असणे आवश्यक आहे.
जेन Z पिढीबद्दल बोलताना जानकीने वेगळे मत मांडले. तिच्या मते, आधीच्या पिढ्या खूप गंभीर आणि तणावपूर्ण जीवन जगल्या. त्यामुळे त्यांना वाटते की जेन Z पिढी कामाबाबत गंभीर नाही. पण प्रत्यक्षात ही पिढी आयुष्य आनंदाने जगण्यावर विश्वास ठेवते. ती म्हणते की ही पिढी स्वतःसाठी उभी राहते आणि स्वतःचा आवाज उठवते. त्यामुळे तिच्या मते जेन Z ही खऱ्या अर्थाने सर्वात परफेक्ट पिढी आहे.
दरम्यान, मर्दानी ३ च्या सेटवर तिची अभिनेत्री राणी मुखर्जीशी भेट झाली. विशेष म्हणजे दोघींनाही त्याच वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे सेटवर छोटासा आनंद सोहळाही साजरा करण्यात आला. राणी मुखर्जींसोबत काम करण्याचा अनुभव प्रेरणादायी आणि अविस्मरणीय असल्याचे जानकीने सांगितले.





