Mardaani 3: ‘मर्दानी ३’ ठरणार फ्रँचायझीतील सर्वात लांब चित्रपट? ट्रेलरनंतर चर्चेत

Mardaani 3: अभिनेत्री राणी मुखर्जी ‘मर्दानी ३’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर चित्रपटाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
आता समोर आलेल्या माहितीनुसार, ‘मर्दानी ३’ हा मर्दानी फ्रँचायझीतील आतापर्यंतचा सर्वात लांब चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाला U/A 16+ प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.
‘मर्दानी ३’ किती लांब आहे?
‘बॉलीवूड हंगामा’च्या माहितीनुसार, ‘मर्दानी ३’ची एकूण लांबी २ तास १० मिनिटे ३६ सेकंद आहे. चित्रपटाचा पहिला भाग १ तास ६ मिनिटे ३० सेकंद, तर दुसरा भाग १ तास ४ मिनिटे ६ सेकंद इतका आहे.
मागील भागांची लांबी किती होती?
- ‘मर्दानी’ (२०१४) – १ तास ५३ मिनिटे
- ‘मर्दानी २’ (२०१९) – १ तास ४५ मिनिटे
या तुलनेत ‘मर्दानी ३’ची लांबी अधिक असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
रिलीज कधी होणार?
‘मर्दानी ३’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आधी हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी रिलीज होणार होता, मात्र नंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.
ट्रेलरला चांगला प्रतिसाद
‘मर्दानी ३’च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याबद्दल बोलताना राणी मुखर्जी म्हणाल्या, “ट्रेलरला मिळालेलं प्रेम हे दाखवतं की, देश म्हणून आपला अंतरात्मा अजून मजबूत आहे. जेव्हा काही चुकीचं घडतं तेव्हा आपल्याला राग येतो, आणि जेव्हा कोणी दुर्बलांसाठी उभं राहतं तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो.”
कलाकारांची फळी
अभिराज मिनावाला यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात राणी मुखर्जीबरोबरच मल्लिका प्रसाद आणि जानकी बोडीवाला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरनंतर खलनायिकेच्या भूमिकेतील मल्लिका प्रसाद यांच्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे.





