Janhvi Sidharth video : ‘परम सुंदरी’च्या प्रदर्शनापूर्वी जान्हवी सिद्धार्थचं तिरुपती दर्शन; व्हिडीओ शेअर अभिनेता म्हणाला…

Janhvi Sidharth video : २९ अॅागस्ट या दिवशी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा परम सुंदरी नावाचा सिनेमा रिलीज होत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदर दोघांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे. तिरुपतीचं दर्शनासाठी आलो असल्याचा रील सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.
बुधवारी संध्याकाळी सिद्धार्थ आणि जान्हवी तिरुमला मंदिरात दर्शसाठी दाखल झाले. या रीलमध्ये दोघेही मंदिराच्या दिशेने चालताना दिसत आहेत. या रीलमध्ये सिदार्थने मी पहिल्यांदाच येथे दर्शनासाठी आलो असल्याचं म्हटलं आहे, तर जान्हवी नेहमी दर्शनासाठी येत असल्याचं त्याने सांगितलं आहे. या रीलमध्ये सिद्धार्थने परम सुंदरी सिनेमा पाहण्याचं प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.
View this post on Instagram
हॅलो गाइज, आम्ही तिरुपतीला जात आहोत,’ तेव्हा जान्हवी लगेच म्हणते, ‘तिरुमला, तिरुपती नाही.’ सिद्धार्थने मान्य करत पुढे म्हणतो, ‘मी पहिल्यांदाच इथे आलो आहे, जान्हवी दरवर्षी येते आणि यावेळी माझी सुंदरी मला इथे घेऊन आलीय, असं सिद्धार्थ म्हणाला आहे. या रीलवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत जान्हवी कपूरचा बॅायफ्रेन्ड शिखर पहारिया याच्याबद्दल विचारपूस केली आहे. आज शिखर सोबत नाही का? असा प्रश्न एका युजरने विचारला आहे.
दरम्यान, जान्हवी आणि सिद्धार्थ यांचा परम सुंदरी नावाचा सिनेमा २९ अॅागस्टला रिलीज होत आहे. दोघेही या सिनेमाला घेऊन खूप उत्सुक आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरला आणि गाण्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा : Tanaji Sawant : तानाजी सावंताच्या मुलाच्या अपहरण नाट्याचा शेवट; पोलिसांकडून ‘बी फायनल’ अहवाल सादर





