अनोख्या डान्स स्टेप्समुळे जान्हवी कपूर झाली ट्रोलिंगची शिकार; कमेंट करत नेटकरी म्हणाले…

मुंबई – बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. अश्यातच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामध्ये जान्हवीचा जबरदस्त असा डान्स पाहायला मिळत आहे.
नुकतंच जान्हवी कपूरनं उदयपुरमध्ये एक डान्स परफॉर्मन्स दिला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. जान्हवीला तिच्या डान्स स्टेप्ससाठी खूप ट्रोल केलं गेलं आहे. यावेळी अभिनेत्री फ्रिंज आणि सेक्विनचा सुंदर ड्रेस परिधान केला असून, यामध्ये जान्हवी खूपच मादक दिसत आहे.
VIDEO – #JanhviKapoor at an event in Udaipur yesterday pic.twitter.com/pJylQaKXaO
— Janhvi Kapoor Universe (@JanhviKUniverse) February 9, 2023
तिनं व्हिडीओत अनोख्या डान्स स्टेप्स दाखवल्या आहेत. ज्यामुळे या व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. नेटकऱ्यानं तिच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं आहे की, ‘क्यूटेस्ट चिक..’, तर एकानं लिहिलं आहे की, ‘हिला वेड लागलं वाटतं..’, अश्या अनेक कमेंट नेटकऱ्यांनी यावेळी तिच्या व्हिडिओवर केल्या आहेत. दरम्यान, चाहत्यांना जान्हवीचा हा डान्स अजिबात आवडलेला नसून, अनेकांनी तिच्यावर ट्रोलिंगचा निशाणा साधला आहे.





