Janhvi Kapoor: “दररोज बोलेन भारत माता की जय”… असं का म्हणाली जान्हवी कपूर

Janhvi Kapoor: मुंबईत जन्माष्टमी उत्सवात “भारत माता की जय”चा नारा देताच अभिनेत्री जान्हवी कपूर ट्रोल्सच्या निशाण्यावर आली. मात्र आता जान्हवीने सोशल मीडियावर संपूर्ण व्हिडिओ शेअर करून ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईतील दहीहंडी सोहळ्यातून वाद
शनिवारी मुंबईच्या घाटकोपर येथे झालेल्या दहीहंडी सोहळ्यात जान्हवी कपूर सहभागी झाली होती. तिने नारळ फोडून मटकी फोडली आणि “भारत माता की जय”चा जयघोष केला. त्यानंतर सोशल मीडियावर काही यूजर्सनी तिची खिल्ली उडवली. अनेकांनी तिला “जन्माष्टमीला स्वातंत्र्यदिन समजली” असे म्हटले. जान्हवीच्या व्हिडिओवरून मेम्स तयार होऊ लागले.
जान्हवीने सांगितली खरी गोष्ट
या टीकाकारांना उत्तर देत जान्हवीने आपल्या इंस्टाग्रामवर इव्हेंटचा पूर्ण व्हिडिओ शेअर केला. त्यात तिने लिहिले,
“तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ. इव्हेंटमध्ये सर्व लोकांनी ‘भारत माता की जय’चा नारा दिला होता. त्यांनी दिल्यावर मी नाही बोलले असते तरही प्रॉब्लेम आणि बोलले तरी तुम्ही त्याला मीम बनवता. असो, फक्त जन्माष्टमीला नाही तर मी रोज बोलेन, भारत माता की जय.”
ट्रोल्सना सराईतपणे उत्तर देणारी जान्हवी
जान्हवी कपूरला ट्रोल्सचा सामना करावा लागणे नवे नाही. काही महिन्यांपूर्वी ती रॅम्पवॉकमुळे चर्चेत आली होती तर तिच्या अभिनयावरूनही ती वेळोवेळी ट्रोल झाली आहे. मात्र प्रत्येक वेळी ती आपल्या ठसक्यात उत्तर देत आली आहे.
लवकरच रिलीज होणार ‘परम सुंदरी’
सध्या जान्हवी आपल्या आगामी चित्रपट ‘परम सुंदरी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती एका दक्षिण भारतीय मुलीच्या भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट 29 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.




