मुंबई – बॉलीवूडमधील पॉप्युलर स्टार डॉटर्सपैकी एक असलेली अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या “धडक’ चित्रपटातून जान्हवी कपूरनं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.
धडक चित्रपटामुळे जान्हवीला स्वत:ची वेगळी ओळख मिळाली असून, अतिशय कमी कालावधीतच जान्हवी लाखो दिलों की धडकन बनली आहे. जान्हवीच्या या चित्रपटातील अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं होत. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी जान्हवी नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओज् चाहत्यांशी शेअर करत असते.
View this post on Instagram
नुकतंच जान्हवीने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले असून, सध्या तिचे हे फोट खूपच व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये जान्हवीचा हॉट अवतार दिसून येत आहे.
View this post on Instagram
जान्हवी स्विमिंग पुल जवळ बसली असून, तिने ब्लॅक कलरचा स्विमसूट परिधान केला आहे. यामध्ये जान्हवीचं सौन्दर्य आणि मादकता सर्वांचा वेड लावणारी आहे. जान्हवीचा बोल्ड अवतार फॅन्सला प्रचंड आवडला असून तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.





