जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राची बाईक राईड

Janhvi Kapoor and Sidharth Malhotra | अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच ‘परम सुंदरी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. जान्हवीने या चित्रपटाच्या तिच्या मजेदार शूटिंगच्या दिवसांची झलक दाखवली आहे.
तिने इंस्टाग्रामवर पडद्यामागील काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती सिद्धार्थ मल्होत्राला बाईक चालवताना दिसत आहे. हे फोटो पोस्ट करताना जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी परमला राईडवर घेऊन गेले की तो खूप खूश होतो.”
या पोस्टमध्ये जान्हवी लाल साडीत आहे, तर सिद्धार्थ मल्होत्रा गुलाबी शर्ट आणि काळ्या जीन्समध्ये दिसत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा नॉर्थ मुलाची भूमिका साकारत आहे. तर, जान्हवी साऊथ गर्लची भूमिका साकारत आहे. Janhvi Kapoor and Sidharth Malhotra |
View this post on Instagram
;
फोटोमध्ये जान्हवी गाडी चालवताना दिसते, तर सिद्धार्थ तिला मार्गदर्शन करत तिला गाडी चालविण्यास मदत करताना दिसून येतो. सध्या त्यांच्या या फोटोवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्याचवेळी, काही नेटकरी चित्रपटातील सिद्धार्थच्या व्यक्तिरेखेचे नाव परम आणि जान्हवी कपूरच्या व्यक्तिरेखेचे नाव सुंदरी असल्याचे म्हणत आहे. Janhvi Kapoor and Sidharth Malhotra |
दरम्यान, ‘परम सुंदरी’ हा चित्रपट केवळ प्रेमकहाणी नसून भारतातील दोन विविध संस्कृतींच्या एकत्र येण्याची गोष्ट आहे. हा चित्रपट २५ जुलै २०२५ रोजी रिलीज होणार आहे. Janhvi Kapoor and Sidharth Malhotra |
हेही वाचा:
‘संसद सर्वोच्च, त्याच्यावर कोणीही वर नाही’ ; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा पुनरुच्चार





