Janhvi Kapoor : अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’चा रॅम्पवर जबरदस्त अंदाज; नेटकऱ्यानं उडवली खिल्ली….

Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केले आहे. जान्हवी अभिनयासह तिच्या फॅशनमुळेही चर्चेत असते. त्याच्या हटके आणि दमदार स्टाइलला अनेकांची पसंती मिळते.
यातच जान्हवी आता फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत भारतातबाहेरही आपली जादू दाखवताना दिसत आहे. जान्हवी अनेकदा वेगवेगळ्या फॅशन रॅम्पवर वॉक करते. नुकतेच अभिनेत्री लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली.
यावेळी तिने काळ्या रंगाचा चमकदार लेग कट आउटफिट घातला होता. या ड्रेसमध्ये अभिनेत्री कमालीची बोल्ड दिसत होती. जानव्हीचा हा मादक अवतार खूपच व्हायरल झाला असून, तिच्या फोटो-व्हिडिओमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
तर दुसरीकडे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. काळ्या रंगाचा चमकदार लेग कट आउटफिट मध्ये जान्हवीने धुमाकूळ घातला आहे. तिला रॅम्पवर विचित्र पद्धतीने चालताना पाहून लोक तिची खिल्ली उडवत आहेत आणि अश्लील कमेंट्स करत आहेत.
रॅम्समध्ये जान्हवी कपूरला पाहून एकाने लिहिले, मॉडेलिंगही खराब कर, ही मांजर चालत आहे की धावत आहे? जान्हवी कपूरला पाहून एका व्यक्तीने म्हटले, तिला अभिनयही येत नाही आणि रॅम्पवर कसे चालायचे हेही कळत नाही.
कंगना यापेक्षा चांगली आहे’. तर काही लोकांनी जान्हवी कपूरला श्रीदेवीबद्दल टोमणेही मारले. ‘ती तिच्या आईचे नाव खराब करत आहे’. असं नेटकरी म्हणत आहेत.
जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘धडक’ या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. नुकताच तिचा ‘मिस्टर एन्ड मिसेस माही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात जान्हवी ही अभिनेता राजकुमार रावसोबत झळकली. आगामी काळात जान्हवी ‘उलझ’ या चित्रपटात झळकणार आहे.





