जान्हवीने केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या किलर पोझमुळे नेटकरी घायाळ

मुंबई – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लाडकी जान्हवी कपूर अनेकदा तिच्या ग्लॅमरने लोकांच्या मनात दहशत निर्माण करते. कधी वेस्टर्न आउटफिट्स तर कधी भारतीय जान्हवी प्रत्येक लूकमध्ये लोकांचे लक्ष वेधून घेते. अलीकडेच जान्हवीने तिचा देसी लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जान्हवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. जान्हवी कपूरचा साडीचा लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. बिकिनी ब्लाउज आणि पांढरी चमकदार साडीमध्ये जान्हवीने आपल्या बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
विशेष म्हणजे जान्हवी या देसी लूकलाही बोल्डनेसचा टच देत आहे. सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असलेल्या जान्हवीचा या लूकवर लाखो चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.
वर्कफ्रंट बाबत सांगायच झाल्यास, जान्हवी कपूरने 2018 मध्ये ईशान खट्टरसोबत ‘धडक’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने तिने लोकांची मने जिंकली आहेत.





