पुणे | जनहित फाउंडेशनची गरजू विद्यार्थ्यांना मदत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे गुणवंतांचा सन्मान आणि गरजूंना शैक्षणिक मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अँड. दिलीप जगताप यांनी व्यक्त केले.
अँड. जगताप यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून न्यू इंग्लिश मांडकी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले.
या वेळी ते बोलत होते. जगताप मागील तब्बल २९ वर्षांपासून अनाथांना शिक्षण, वंचितांना मदतीचा हात आणि वृद्धांना मायाचा आधार देण्याचे कार्य नि: स्वार्थ आणि नि:स्पृह भावनेने करत आहेत.
या वेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अविनाश भोसले, सुभाष बोरकर, शाळा समितीचे अध्यक्ष मानसिंग जगताप,
सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक विश्वास जगताप, उपसरपंच मोहन जगताप, पोलीस पाटील श्रीतेज जगताप, गणेश जगताप, अरविंद जगताप यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.




