जनहित फाउंडेशनची गरजू विद्यार्थ्यांना मदत

पुणे – विद्यार्थी हे भाग्य विधाते आहेत, देशाचे भवितव्य आहेत. यामुळे गुणवंतांचा सन्मान आणि गरजूंना शैक्षणीक मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अँड दिलीप जगतापांनी व्यक्त केले. अँड दिलीप जगताप यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून न्यू इंग्लिश मांडकी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी ते बोलत होते.
अँड दिलीप जगताप मागील तब्बल २९ वर्षांपासून अनाथांना शिक्षण, वंचितांना मदतीचा हात आणि वृद्धांना मायेचा आधार देण्याचे कार्य नि:स्वार्थ आणि नि:स्पृह भावनेने करत आहेत.
यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अविनाश भोसले, सुभाष बोरकर, शाळा समितीचे अध्यक्ष मानसिंग जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास जगताप, उपसरपंच मोहन जगताप, पोलीस पाटील श्रीतेज जगताप, गणेश जगताप, अरविंद जगताप यांच्यासह शिक्षण, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





