जनता वसाहत पॅटर्नला छेद; तीन दिवसात सात बाधित
Updated On:

तीन दिवसात सापडले सात करोना बाधित
– सुनील राऊत
पुणे : गेली 45 दिवस स्वयंशिस्तीने करोना संक्रमण रोखण्यात यश आलेल्या पुण्यातील जनता वसाहत पॅटर्नला अखेर छेद गेला आहे. या वसाहतीत कंटेन्मेंट झोन मधून राहण्यास आलेल्या काही व्यक्तीमुळे करोनाचा शिरकाव झाला असून मागील 3 दिवसात 7 करोना रुग्ण सापडले आहेत. तर आणखी 2 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रुग्ण संख्या वाढली आहे.
तर सिंहगड रस्ता परिसरातच वडगावमध्ये रहात असलेल्या पालिकेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. तर रायकरमळा येथे सदाशिव पेठेत मेडिकल डिस्ट्रीब्युटर मध्ये काम करणारा कर्मचारी सापडला आहे. त्यामुळे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रुग्ण संख्या 23 वर गेली आहे.





