Jejuri News : जेजुरीतील ५०० महिलांना घडविली जानाई देवी यात्रा
Jejuri News : श्री क्षेत्र जेजुरी ते निवकणे येथे देवदर्शनासाठी जेजुरी शहरातून मोफत ११ एसटी बसेसची सोय करण्यात आली होती.

जवळार्जुन : जेजुरी शहरातील ग्रामदेवता जानाई देवीच्या दर्शनासाठी जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवकणे या पाटण (जि. सातारा) येथील मुळ शक्तीपीठ जानाई देवी यात्रेसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र जेजुरी ते निवकणे येथे देवदर्शनासाठी जेजुरी शहरातून मोफत ११ एसटी बसेसची सोय करण्यात आली होती.
या उपक्रमाला जेजुरीकर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात्रेचा आनंद घेतला. मोफत बससेवेच्या माध्यमातून जेजुरी परिसरातील ५०० हून महिला, अबाल वृद्ध, भाविकांना निवकणे येथील जानाई देवी मंदिर येथे जाऊन भक्तीभावाने जानाई देवीचे दर्शन घेतले. जेजूरीकर नागरिकांना वृद्ध,महिलांसाठी सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची व्यवस्था करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
यात्रेनिमित्त सर्वांसाठी चहा,नाष्टा, पाणी आणि जेवणाची सुविधा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. या देवदर्शन यात्रेचे नियोजन जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, नगरसेवक योगेश जगताप, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, माजी नगरसेवक दादा उबाळे, सुशील राऊत, संतोष खोमणे, जालिंदर खोमणे, राजू पानसरे, तसेच जेजुरी नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवक आणि त्यांच्या सहकारी यांनी सहभाग घेतला.





