Jammu-Kashmir : दहशतवाद्यांचा अड्डा उद्धवस्त; शस्त्रसाठा जप्त
Updated On:

Jammu-Kashmir – जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा अड्डा उद्धवस्त केला. त्यावेळी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा अड्डा असल्याची माहिती गुप्तचरांकडून देण्यात आली. त्याआधारे सुरक्षा दलांनी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी केलेल्या कारवाईवेळी संबंधित ठिकाणी कुठला दहशतवादी आढळला नाही.
मात्र, दहशतवाद्यांनी जमवलेला एके-४७ रायफल्स, पिस्तुल आणि इतर दारूगोळा साठा हस्तगत करण्यात आला. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी काश्मीरमध्ये आणखी घातपाती कृत्ये घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती आहे.
त्यामागे शांतता आणि सुव्यवस्था स्थितीला धक्का पोहचवण्याचे नापाक मनसुबे आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचे डाव उधळून लावण्यासाठी सुरक्षा दले पुरेशी सतर्कता बाळगून आहेत.





