“मतदान करून लोकशाही मजबूत करा” ; पंतप्रधानांसह, जेपी नड्डा यांनी जम्मू-काश्मीरच्या मतदारांना केले आवाहन

Jammu Kashmir Election Phase 2। जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज 26 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 239 उमेदवार निवडणूक लढले आहेत. सुमारे 25 लाख मतदार आज घराबाहेर पडून मतदान करतील आणि सर्व उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
पंतप्रधान मोदींनी मतदान करण्याचे आवाहन Jammu Kashmir Election Phase 2।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करत, “आज जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दुसरा टप्पा आहे. मी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतो आणि लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका बजावावी. या प्रसंगी मी, जे तरुण मित्र पहिल्यांदाच मतदान करणार आहेत त्यांचे अभिनंदन.”असे आवाहन त्यांनी केले आहे.
जम्मू-कश्मीर में आज विधानसभा चुनाव के दूसरे दौर की वोटिंग है। सभी वोटर्स से मेरी अपील है कि वे अपना वोट जरूर दें और लोकतंत्र को मजबूत बनाने में अपनी अहम भूमिका निभाएं। इस अवसर पर पहली बार वोट डालने जा रहे सभी युवा साथियों को मेरा अभिनंदन!
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2024
असे आवाहन जेपी नड्डा यांनी जनतेला केले Jammu Kashmir Election Phase 2।
तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “आज मी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्व मतदारांना, विशेषत: तरुण मित्रांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. तुमचे प्रत्येक मत सेवेसाठी आहे. ” विकासाच्या स्थापनेसोबतच लोकशाहीला भ्रष्टाचार, घराणेशाही, आणि अराजकतेपासून मुक्त करणे ही आपल्या सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. या निवडणुकीत लोकांचा सहभाग जम्मू-काश्मीरच्या सुवर्ण भविष्याचा मार्ग मोकळा करेल.” असे म्हटले आहे.
हेही वाचा
जम्मू-काश्मीरच्या २६ जागांवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; फुटीरतावादी नेतेही रिंगणात





