जम्मू-काश्मीरच्या २६ जागांवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; फुटीरतावादी नेतेही रिंगणात

Jammu Kashmir Election । जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज 26 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 239 उमेदवार निवडणूक लढले आहेत. सुमारे 25 लाख मतदार आज घराबाहेर पडून मतदान करतील आणि सर्व उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
2014 पासून आतापर्यंत 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी 24 जागांसाठी मतदान झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर आज मतदान होत आहे. मतदानादरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा Jammu Kashmir Election ।
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. श्रीनगरमधील बलहामा येथील मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत.
श्री माता वैष्णोदेवी विधानसभेत प्रथमच मतदान Jammu Kashmir Election ।
श्री माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बलदेव राज शर्मा यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी त्यांच्या निवासस्थानी प्रार्थना केली. श्री माता वैष्णो देवी विधानसभा मतदारसंघ हा सीमांकनानंतर निर्माण झालेला नवीन मतदारसंघ असून या मतदारसंघासाठी प्रथमच मतदान होत आहे.
दरम्यान , भारतीय निवडणूक आयोगाने 26 भागात 3502 मतदान केंद्रे तयार केली आहेत, जेणेकरून मतदार कोणत्याही त्रासाशिवाय आरामात मतदानाचा हक्क बजावू शकतील.
हेही वाचा
#Horoscope 25 September 2024 : आजचे भविष्य ( 25 सप्टेंबर 2024 )





